तोंडातून सतत दुर्गंधी येते ? हे उपाय करा



आपण काही खाल्ल्यामुळे किंवा जेवणानंतर तोंड आतून स्वच्छ न केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. 

पण आता चिंता करू नका आम्ही तुम्हाला तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. 


दुर्गंधीची काही कारणे

  • पचन क्रियेत बिघाड
  • दात कुजणे
  • पोटात काही गडबड होणे
  • हिरड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणे

जाणून घ्या उपाय  

● जेवणात कच्चा कांदा लसूण आणि मसाल्याच्या पदार्थांचा वापर कमी करावा.

● तोंडाला स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी चूळ भरा. 

● वेळेवर जेवण करावं आणि दातांमधील अडकलेल्या अन्नाला नेहमीच स्वच्छ करावं. 

● सतत पाणी प्या. माऊथवॉश आणि मुखवास (माउथ फ्रेशनर) वापरणं गरजेचं आहे.

● जेवणानंतर काही काळ चालणे किंवा पाचक गोष्टींचे सेवन करा

● तंबाखू आणि सिगारेट या व्यसनांना दूर ठेवा.

● बडी शोप, वेलची, ज्येष्ठमध, भाजलेलं जिरं, धणे यांचे सेवन करा.