पावसाळयात संसर्गापासून दूर राहण्यासाठी काही खास टिप्स

पावसाळयात संसर्गापासून दूर राहण्यासाठी काही खास टिप्स


● बहुतांश जणांना आवडणारा पावसाळा आला आहे. मात्र त्याचबरोबर या ऋतूत आजारी पडण्याची देखील जास्त शक्यता असते. 

● म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी काही खास टीप आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

● पावसाळ्यात बाहेरचे काहीही खाणे टाळा.दूषित अन्न,पदार्थ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

● पावसाळ्यात सॅलड कापल्यावर लगेच त्याला खाऊन घ्यावे.तसे तर पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाऊ नये.

● दूषित पाणी प्यायल्याने अतिसार होतो.जर असं होत असेल तर पाणी उकळवूनच थंड करून प्यावं.

● पावसात कधीही ओले केस बांधू नका.यामुळे आपल्या डोक्यात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

● पावसाळ्यात ओले झाल्यास किंवा कपडे ओले असल्यास ते घालू नका.या मुळे त्वचेशी संबंधित त्रास होऊ शकतात.

● आपल्या हाताची नखे वाढवू नका.या मध्ये घाण साचून राहते आणि ही घाण आपल्या पोटात जाऊ शकते.

● शूज पूर्णपणे कोरडे करूनच घाला.बऱ्याच वेळा ऑफिस किंवा बाहेर जाताना हलके ओलसर मोजे किंवा शूज घालतो असं करणे धोकादायक असू शकतं.