शेवगा बऱ्याच जणांना आवडत नाही. मात्र....Many people do not like shevaga. Only ....

शेवगा बऱ्याच जणांना आवडत नाही. मात्र त्याच्या बियांचे फायदे जाणून घेतल्या नंतर तुम्ही सुद्धा शेवग्याच्या शेंगा खाल.



● शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट होते. यामध्ये असलेले क जीवनसत्व शरीराचे अनेक तऱ्हेच्या जंतूंच्या संक्रमणापासून दूर ठेवते.


● यामध्ये असलेले डायटरी फायबर पोट जास्त काळ भरलेले ठेऊन वारंवार भुकेची होणारी भावना कमी करीत असल्याने, व अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास सहायक असल्याने, ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल, त्यांच्यासाठी देखील शेवग्याच्या बिया उपयुक्त आहेत.


● आजकाल बाजारामध्ये शेवग्याची पावडरही उपलब्ध आहे. गरम पाण्यामध्ये ही पावडर घालून दररोज रात्री याचे सेवन केल्यास निद्रानाशाचा विकार दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने शारीरिक थकवा दूर होऊन शरीरामध्ये चैतन्य निर्माण होते.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.