डोळ्यांची आग होत असले तर 'हे' घरगुती उपाय ट्राय करा
कोरोनामुळे लॉकडाऊन व यामध्ये वॉर्कफ्रोम होम मुळे अनेकांना डोळ्याच्या समस्यांचा त्रास जाणवू लागला आहे. यातच डोळे जळजळ होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
म्हणून आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत...
● काकडी - डोळ्यात आग होत असल्यास काकडीचे काप करून ते काहीवेळ डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील आग कमी होते.
● बटाटा - डोळ्यांची आग होत असल्यास डोळ्यांवर बटाट्याचे काप ठेवावेत. यामुळेही डोळ्यात आग होणे कमी होते.
● गुलाब जल - गुलाबजलाचा एक थेंब डोळ्यात घातल्यानेही डोळ्यातील आग कमी होण्यास मदत होते.
● तेल मालिश - रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यात आग होणे थांबते.
● डोळे स्वच्छ पाण्याने डोळे धुवा - दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाऊन डोळ्यांची आग कमी होते.
टिप्पणी पोस्ट करा