कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व ....The importance of the immune system due to the corona
कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी जागरूक होत आहे.
रोगप्रतिकारक शक्ती केवळ सर्दी, खोकला यापासून वाचवत नाही तर नेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असण्याची अनेक कारणं असू शकतात. आज आपण त्याची काही लक्षणं पाहुयात..
● सतत थकवा जाणवणे.
● झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवणे.
● सतत संसर्ग होणे, सतत आजारी पडणे.
● झालेली जखम लवकर बरी न होणे.
● व्हिटॅमिन डीची कमी.
● याशिवाय सुस्ती, निद्रानाश, नैराश्य आणि डार्क सर्कल्स हे देखील कमकुवत प्रतिकारशक्तीची लक्षणं आहेत.
अगोदरच असलेला एखादा आजार किंवा धुम्रपान, मद्यपानाची सवय, झोप पूर्ण न होणं, खाण्या-पिण्याची अयोग्य सवय यामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही
टिप्पणी पोस्ट करा