5G टेक्नोलॉजी आरोग्यास हानिकारक? सीओएआयने दिले स्पष्टीकरण



● नुकतच अभिनेत्री जुही चावला हिने 5G वायरलेस नेटवर्कला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने 5G टेक्नोलॉजीमुळे निसर्गाची हानी होत असल्याचं म्हटलं आहे.

● मत्रर दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी जूही चावला ची याचिका फेटाळून लावत तिला २० लाख रुपये दंड ठोठावला आहे. त्यानंतर आता सीओएआयने देखील स्पष्टीकरण दिले आहे.

● आतापर्यंत जे काही पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार  हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आहे, यामुळे अर्थव्यवस्था आणि समाजाला जबरदस्त फायदा होईल, यावार सीओएआयने म्हटले आहे.

● वोडाफोन-आयडिया यासारख्या मोठ्या कंपन्यांचं COAI प्रतिनिधित्व करते. भारतात दूरसंचार क्षेत्रात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मर्यादेसंदर्भात आधीच कडक नियम आहेत. ते जागतिक पातळीपेक्षा देखील खडक आहेत.

● त्यामुळे नवीन तंत्रज्ञान देखील भारतीय दूरसंचार नियमांमध्ये बसणारे आहे. त्याचा कोणताही परिणाम आरोग्यावर तसेच निसर्गावर होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केल आहे.