पावसाळ्यात डासांपासून बचावासाठी काही खास टिप्स



पावसाळ्यात डासांची पैदास खूप झपाट्याने होत असते. त्यामुळे आपण पावसात डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. 


डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय

1. स्वयंपाकघरात रोजच्या वापरात असलेला लिंबू कापून आपल्या शेजारी ठेवल्यास आजूबाजूला असलेले डास पळून जातात.

2. खोबरेल तेलात खोडी लवंग मिसळून त्वचेवर लावल्यास डास चावण्याची भीती नसते.

3. 4 ते 7 तुळशीच्या पानांचा रस अंगाला लावल्यास डास चावत नाहीत.

4. संत्र्याच्या सुकवलेल्या साली कोळश्यावर भाजल्यास त्या वासाने डास नाहीसे होतात.

5. लिंबू मध्यभागी कापून त्यावर लवंग लावल्यामुळे डास जवळपास फिरकतही नाहीत.

6. ऑल आऊटच्या रिकाम्या बाटलीत कडुलिंबाचे तेल आणि कापूर घालून ती लावा. असे केल्याने डास घरात येणार नाहीत.