...म्हणून लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय!



गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना साथीच्या आजाराला सामोरे जात आहोत. आता पुन्हा गेल्या वर्षीच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होत आहे. याचा आपल्या लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.  

कोरोना साथ आली आणि आपण सर्व यामध्ये अडकलो. वाटले होते हि साथ दोन महिन्यात जाईल. मात्र अद्याप देखील तीच परिस्थिती आहे. ‘न्यू नॉर्मल’ आता आपली जीवनशैली बनली आहे. त्यामुळे आता आपण स्वतःला  घरून काम करणे, जास्त घराबाहेर न पडणे आपल्या कुटुंबियांसमवेत राहणे आणि सर्व प्रकारच्या समाजीकरणाची सवय लावत आहोत. या सर्व परिस्थितीमध्ये आपले लहान मुलांकडे दुर्लक्ष झाले. कारण मोठी माणसे हि परिस्थिती समजून घेऊ शकतात. मात्र लहान मुले यामध्ये सैरभैर झाले आहेत. त्यांना काही माहीतच नव्हते.   

आता लहान मुलांच्या आयुष्यातील सकाळची धावपळ अचानक बंद झाली. गर्दी नाही, मित्रांच्या भेटी नाही,  मित्रांसोबत जेवण करता येत नाही, पाठीवर शिक्षकांची थाप पडत नाही, घराबाहेर पडता येत नाही. जो त्यांच्या स्वच्छंदी जगण्याचा पाय होता तो आता ऑनलाईन झाला आहे. जे पालक मुलांना केवळ १ तास मोबाईल लॅपटॉप देत होते  तेच आता त्यांना ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉपच्या समोर ४ चार तास बसवतात. त्यामुळे मुले पालकांच्या भीतीखाली वावरत आहेत.  

   असं म्हणतात की, मुलांना वाढवायला एक गाव लागतं. विभक्त कुटुंबांमध्ये, मुलांना हे गाव मिळतं. ते  शाळेतील शिक्षक, शाळे नंतरचे मनोरंजन वर्ग किंवा शिकवणी वर्ग, मित्रांचे वाढदिवस, सुट्टीच्या दिवशी आजोबांना भेट देण्यासाठी आणि आठवड्याच्या शेवटी पालकांसह वेळ घालवणे, आठवड्याच्या शेवटी आई वडिलांना देखील मोकळा वेळ लागतो. मुलांना हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणे, त्याचबरोबर  मॉल्समधील प्ले झोनमध्ये खेळणे, हे सर्व मुलांना एक चांगले जीवन देत असताना एका विषाणूने हि सगळी जीवन शैली बदलली. आता पालक घरातून त्यांच्या कार्यालयांचे कामे करतात, मुले ऑनलाईन वर्ग करतात यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.     

आता आपण कोविडसह जीवन जगण्याची सवय लावू लागलो आहोत, मात्र त्याचबरोबर लहान मुलांच्या भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. भविष्यातील पिढी तयार करण्याच्या दिशेने कार्य करण्याची गरज आहे. जेणे करून त्यांना भावी काळात साथीच्या आजराला सामोरे जाताना समस्या निर्माण होणार नाही. हा यामागील मोठा हेतू आहे.

या दिशेने पहिले पाऊल म्हणजे मुलांवर असलेला भावनिक ताणतणाव ओळखणे. यामध्ये खालील लक्षणे दिसून येतील...

मुले त्यांच्या समवयस्क गट, शिक्षक, भाऊ बहीण, मित्र किंवा कुटूंबापासून वेगळे होत आहे, चिडचिड होणे



विनाकारण राग येणे, विचित्र वागणे, अनोळखी लोकांना घाबरणे, दडपणाखाली राहणे, छोट्या छोट्या कारणांवरून रडणे, अशक्तपणा, स्वतःची काळजी न घेणे, प्रेरित न होणे, चांगली झोप न घेणे.

आता, पालकांना त्यांच्या मुलांबरोबर अधिक वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना अधिक भावनिक आधार देण्यास सांगणे सोपे आहे, परंतु कसे? कारण सर्व काळजी आणि प्रेम देऊन देखील आपण पालकांना दोष देऊ शकत नाही. अशी परिस्थिती आहे.  

 माझ्याकडे मुलांना आधार देण्याचे काही मार्ग आहेत ज्यामुळे माझ्या मुलाला देखील मी आधार देऊ शकलो.

मुलांना प्रोत्साहित करा : मुलांना बागकाम करायला लावा. कारण निसर्गाच्या सानिध्यात तणाव कमी होण्यास मदत होते. आपल्याला अधिक उत्साही आणि स्पष्टपणे विचार करण्यास सक्षम बनवते. ज्याला चिंता किंवा नैराश्याने ग्रासले आहे. अशा अनेकांना वनस्पतींची देखभाल आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरली आहे. यामध्ये तुम्ही त्यांना घरगुती वापारासाठीच्या लहान-लहान कुंड्यांमध्ये झाडे लावायला सांगू शकतात.

यामागे वैज्ञानिक कारण असे आहे कि, झाडे लावताना त्यावर लक्ष केंद्रित केल्याने मन प्रफुल्लित होते आणि आपला ताण दूर होतो. तसेच, मातीत आढळणारे मायकोबॅक्टीरियम मेंदूची कार्ये सुधारू शकतात तसेच आपली  मनःस्थिती, आतड्याचे आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. मातीमध्ये आढळणारे मायकोबॅक्टीरियम व्हॅक्यू मेंदूत तयार होणारे सेरोटोनिन वाढवते. त्यामुळे मुलाचे हात मातीने खराब होतील  मात्र त्यांना तुम्ही आनंदी करू शकता.  

 घरातल्या घरात पूल पार्टीचे आयोजन करा : आपल्या घरात परिसरात मोकळी जागा असेल तेथे मुलांना पाण्यात खेळण्यासाठी जागा निर्माण करून मुलांना आनंदी बनवा. पाण्यात खेळल्याने मुले अत्यानंद मिळवतात. हे खूप मजेदार आहे आणि त्यांचे श्वसन प्रणालीवर देखील कार्य करते.    

पूर्वी घरातील कामे उरकून कॅरम, लूडो, साप आणि शिडी सारखे बोर्ड गेम खेळत असत आणि आम्ही लहान होतो तेव्हा पावसाळ्याच्या दिवसात स्टील किचनच्या सेटसह खेळायचो. रात्रीच्या जेवणाच्या अगदी एक तासापूर्वी, हा खेळ खेळला जायचा तसेच जुने फोटो पाहून जुन्या आठवणींना उजाळा द्या. यामुळे मुले नवीन गोष्टींमध्ये रमून जातील.    

त्यांना घरातील कामात सामील करा, घरगुती कामे केल्याने मुलांना पालकांना मदत केल्याचे समाधान मिळेल. मुले स्वत: ला कुटुंबाचे एक घटक मानतात. त्यांचा कुटूंबाशी सखोल संबंध वाढतो. त्यांच्या कामासाठी त्यांना जबाबदार धरल्यास त्यांची कर्तव्य आणि मालकीची भावना वाढू शकते. जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने त्यांना समाधान  मिळेल. त्याच बरोबर त्यांना कामाची सवय देखील लागेल. यामध्ये त्यांना धुतलेले कपड्यांच्या घड्या घालणे,   भाज्या धुणे, खाल्ल्यानंतर स्वतःची प्लेट धुणे इत्यादी छोटी-छोटी कामे सांगा. एकत्र मटार सोलणे किंवा कोथिंबीर निवडणे अशी कामे द्या. हे लक्षात ठेवा त्यांना ऑर्डर देण्याऐवजी कामाची यादी तयार करा आणि मग त्यांना जे काम करण्यास आवडेल ते निवडण्यास सांगा. अशाप्रकारे, त्यांना अधिक समाधान वाटेल.    

त्यांना बोलण्यास आणि व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करा : हे अवघड आहे, परंतु काही गोष्टी  मुलांना त्यांची भावना व्यक्त करण्यास मदत करू शकतात. एक चांगला आणि जुन्या पद्धतीचा मार्ग म्हणजे एकमेकांना पत्रे लिहिणे, यामध्ये त्यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लावा त्यांच्याशी तुमच्या भावना आणि असुरक्षित वाटत असेल तर यावर देखील बोला; हे आपल्यासह त्यांचे सामायिकरण करण्यात अधिक आत्मविश्वास वाढविण्यात मदत करेल.

शब्दांबरोबर त्यांना स्पर्शातून व्यक्त व्हायला लावा. जसे मिठी मारणे, चुंबन घेणे, शारीरिक स्पर्श ऑक्सिटोसिनमध्ये एक लाट निर्माण करतो. यामुळे मुलांमध्ये संगोपन आणि प्रेमसंबंधाची तीव्र भावना निर्माण होण्यास मदत होते आणि त्यांच्या भावना नियंत्रित करण्यास मदत होते. हे सिद्ध झाले आहे की, मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन सोडले जाते. जे आपल्या शरीरात एक रसायन आहे ज्यास “कडल हार्मोन” देखील म्हणतात. जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो, स्पर्श करतो किंवा जवळ बसतो तेव्हा त्याची पातळी वाढते. ऑक्सिटोसिनमुळे तणाव हार्मोन नॉरपेनेफ्रीन कमी होते आणि रक्तदाब देखील कमी