मूल अजून बोलत नाही ( Mul Ajun Bolat Nahi )

मूल अजून बोलत नाही ( Mul Ajun Bolat Nahi )


लहान मूल आल्यानंतर घरातील आनंद द्विगुणीत होतो.आई वडील त्या मुलाच्या विश्वात गुंग होतात.मुल साधारण एक ते दीड वर्षाचे झाल्यावर बोलू लागते.मुलाचे बोल ऐकण्यासाठी घरातल्यांचे कान आसुसतात.पण काही मुलं लवकर बोलत नाहीत.याला अनेक कारणे आहेत.

सामान्य बाळाचे श्रवण व भाषा विकासाचे टप्पे

० ते ६ महिने 

मोठ्या आवाजाला दचकाने आणि ओळखीच्या आवाजाला शांत बसने (आई - वडील)


३ ते ६ महिने 

आवाजाच्या दिशेने मन फिरवणे


६ ते २० महिने 

सर्व साधारण शब्द बोलणे जसे - आई वडील


१० ते १८ महिने 

छोटे छोटे वाक्य समाजाने शरीराचे अवयव व आवाजाची ओळख 

आपल्या बाळामध्ये वरील विकासामध्ये काही फरक असेल तर त्वरित वाचा व ऐकण्याची कानाची श्रवण  तपासणी करून घ्या

डॉ . विलास राठोड 

Founder At VR Speech And Hearing Clinic



बोलता न येण्याचे करणे

ऐकू न येणे/कमी येणे

बोलण्यासाठी पहिला शब्द ऐकू यावे लागतात.काही मुलांना कमी ऐकू येणे अथवा ऐकू न येणे अशा समस्या असू शकतात.अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्लो डेव्हलपमेंट

काही मुलांची वाढ ही हळू असते.अशावेळी मुलांच्या बोलण्याच्या वाढीचा वेगही मंदावतो.अशावेळी डॉक्टरांची मदत घ्या.

पालकांचे कमी बोलणे

आपल्या मुलाशी पालक जास्त बोलत नसतील तरीही ही समस्या निर्माण होऊ शकते. मुलाच्या कानावर शब्द पडले नाही तर ते लवकर बोलत नाही.

स्क्रीन टाईम

आजकाल अनेक पालक मुलांच्या हातात मोबाईल,टॅब देतात.मूलं शांत राहावीत,त्यांनी दंगा मस्ती करू नये यासाठी त्यांना टीव्हीच्या समोरही बसवले जाते.पण यामुळे मुलाचे लक्ष त्या स्क्रीन कडे राहते व ते बोलण्याचा प्रयत्नच करत नाही.एक अभ्यास असा सांगतो की ज्या मुलांना मोबाईल,टीव्ही,टॅब दिले जात नाहीत ते लवकर बोलायला शिकतात.त्यामुळे लहान मुलाला अशा स्क्रीन पासून लांबच ठेवावे.

लहान कुटुंब

कुटुंब लहान असेल तरीही मुलं बोलायला खूप वेळ घेतात.याउलट एकत्र कुटुंबातील मूलं लवकर बोलायला लागते.


या वरील उपाय

मुलासोबत भरपूर बोला.

लहान मुलाला बोलत येत नसले तरी ते सर्व काही ऐकत असते.कानावर पडलेले आवाजाची नक्कल करायचा प्रयत्न ते करत असते.यातूनच ते बोलायला सुरू करते.त्यामुळे लहान मुलासोबत सतत काही नाही बोलणे आवश्यक आहे.

प्रोत्साहन द्या

लहान मूल हळूहळू बोलू लागतात.मुलाने एखादा शब्द अडखळत जरी बोलला तरी त्याला शाबासकी द्या.त्याच्याकडे बघून हसल्याने,मान हलविल्यानेही त्याला आपण शाबासकी देत आहोत हे कळते.

छोटे शब्द

लहान मुलांशी बोलताना छोटे छोटे शब्द वापरावेत. तसेच जोडाक्षरे ,अवजड शब्द वापरु नयेत.असे शब्द उच्चारायला सोपे असल्याने मुलं ते पटकन बोलू शकते.उदा.काका,मामा,बाबा असे शब्द वापरावेत.

खाणाखुणा समजून घ्या

लहान मूल अनेकदा न बोलता केवळ हातवारे करून सांगत असते.उदाहरणार्थ त्याला पाणी पाहिजे तर ते पाण्याच्या बाटलीकडे बोट करेल.अशावेळी आपणही त्या बाटलीकडे बोट करून तुला पाणी पाहिजे का ? असे विचारावे

स्क्रीन टाईम कमी करा

स्क्रीन टाईम म्हणजे टीव्ही,लॅपटॉप,मोबाईल,टॅब अशा डिजिटल उपकरणांसमोर घालविलेला वेळ.तुमचे मुलं जर अशा उपकरणांसोबत जास्त काळ घालवत असेल तर त्याच्या बोलण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे अशी उपकरणे लहान मुलाला देऊच नयेत


Special Need 4 Child YouTube   Blog