पक्षघात (पॅरालिसिस) पासून बचाव



डॉ. मुकूद विधाते न्युरोफिजीशियन, अ.नगर

पक्षघात (पॅरालिसिस) मुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पक्षघात हा अतिशय घातक असा आजार आहे. दर दोन सेकंदाला जगात एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ७० लाख लोकांना पक्षघात होतो आणि त्यापैकी ६० लाख लोक दगावतात. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. आपल्या देशात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षघात होतो म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराने बळी पडतात. पक्षघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये पक्षघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षघात होतो त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असल्याचे प्रतिपादन सिनॅप्स् न्युरोकेअर सेंटरचे मेंदुविकार तज्ञ डॉ.मुकुंद विधाते यांनी पत्रकार परिषदेत केले.

मद्यपान करणे, धुम्रपान करणे, व्यायाम न करणे, टेन्शन घेणे यामुळे भारतात तरुणामध्ये पक्षघाताचे प्रमाण जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देतांना डॉ.विधाते म्हणाले की, पक्षघात झालेले ३० टक्के लोक मृत्युमुखी पडतात आणि उरलेल्या ३० टक्के लोकांमध्ये अपंगत्व येते. जंक फूड खाणे,

९० टक्के लोकांमध्ये पक्षघात हा हाय ब्लडप्रेशर, धुम्रपान, मधुमेह, मद्यपान, लठ्ठपणा, रक्तात कोलेस्ट्रॉलचे जास्त प्रमाण, व्यायामाचा अभवा, चुकीचा आहार, , हृदयरोग आणि जीवनसत्व बी १२ ची कमतरता या प्रमुख कारणांमुळे होतो. हवेतील प्रदुषणाची स्ट्रोकशी संबंध आहे. ज्यांचे ब्लडप्रेशर जास्त असते त्यांना ६ ते ६ पटीने पक्षघात येण्याची शक्यता असते. जेव्हा मेंदूची रक्तवाहिनी बंद होते किंवा फाटते तेव्हा पक्षघात किंवा स्ट्रोक होतो. ८५ टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते आणि मेंदूच्या काही भागाला रक्तप्रवाह आणि प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे मेंदूच्या पेशी निष्क्रिय होतात. तर १५ टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी फाटते. त्याला ब्रेन हॅमरेज असे म्हणतात. २५ टक्के रुग्णांमध्ये एकदा स्ट्रोक आल्यानंतर दुसरा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. तो येऊ नये म्हणून आयुष्यभर औषध गेणे गरजेचे आहे. ज्या कारणामुळे पक्षघात होतो त्यावर नियंत्रण केले तर