या घरगुती उपायांनी सर्दी - पडसे पासून मिळवा सुटका



● वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला आदी आजारांचा प्रादुर्भाव वेगाने पसरू लागला आहे. यामुळे या काळात शरीराची काळजी घेणे अत्यावश्यक बनते.

● जर सर्दी, पडसे व खोकल्यामुळे तुम्ही त्रस्त झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे या समस्यांपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 

● मधाचा चहा - खोकल्यासाठी एक लोकप्रिय घरगुती उपाय म्हणजे कोमट पाण्यात मध मिसळणे. मध खोकल्यापासून आराम देऊ शकते. 

● मीठ - पाण्याचे गुळने करा - घसा खवखवणे आणि ओल्या खोकल्याच्या उपचारांसाठी हा सोपा उपाय सर्वात प्रभावी आहे. मीठाचे पाणी घशाच्या मागील भागातील कफ आणि श्लेष्मा कमी करते, ज्यामुळे खोकला बरा होतो.

● ओव्याचे फुले -ओव्याचा वापर खाण्यात आणि उपचारात प्रभावी आहे.हे खोकला, घसा खवखवणे, ब्राँकायटिस आणि पाचक समस्यांवर एक सामान्य उपाय आहे. ओवा आणिओव्याची पाने असलेले खोकल्याचे सिरप तीव्र ब्राँकायटिस असलेल्या लोकांमध्ये खोकल्यात लवकर आराम देते.

● आलं - आलं कोरडा खोकला किंवा दम्याचा खोकला कमी करू शकते, कारण त्यात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म आहेत. हे वेदना कमी करू शकते.