जाणून घ्या व्हायरल तापाची लक्षणे आणि उपाय



पावसाळ्यात व्हायरल तापाची भिती सर्वात जास्त असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही घरघुती उपाय सांगणार आहोत.


व्हायरल तापाची लक्षणे :

▪️ घशात वेदना होणं

▪️ सांधे दुखी

▪️ डोळे लाल होणं

▪️ कपाळ तापणे

▪️ खोकला

▪️ थकवा जाणवणे

▪️ उलट्या होणं

यावर घरगुती उपाय :

✅ हळदी आणि सुंठ पूड - सुंठ म्हणजेच आल्याची पूड आणि आल्यामध्ये ताप बरे करण्याचे गुणधर्म असतात. या साठी एक चमचा काळी मिरपुडीत एक लहान चमचा हळद, एक चमचा सुंठ पूड आणि साखर मिसळा.हे सर्व साहित्य एक कप पाण्यात घालून गरम करा नंतर थंड करून पिऊन घ्या.असं केल्याने व्हायरल तापाचा नायनाट होईल.

✅ धण्याचा चहा - धण्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. याचा चहा बनवून प्यायल्यानं व्हायरल तापात आराम मिळतो.

✅ मेथी दाणे : एक कप मेथी दाण्याला रात्रभर भिजत घाला आणि सकाळी हे पाणी गाळून प्यावं.

✅ लिंबू आणि मध - लिंबाचा रस आणि मध देखील व्हायरल तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आपण मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन देखील करू शकता.