जाणून घ्या बहुगुणकारी जायफळचे महत्वपूर्ण फायदे



● जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. 

● जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. 

● पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. 

● जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. 

● दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हा लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाबूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहर्याावरील डाग नाहीसे होतात.

● संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. 

● पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे 2-3 थेंब साखरेत मिसळून खावेत.