गाढ झोप करू शकते लठ्ठपणा आणि डिप्रेशन दूर वैज्ञानिकांचा दावा



● पुर्ण झोप अत्यंत गरजेची आहे. विशेष करून गाढ झोप. ही आपल्या शरिराला आपली शारीरीक यंत्रणा दुरुस्त करण्याची शक्ती देते. जर तुम्ही ८ तास झोपत असाल तर यातील २० टक्के म्हणजेच ९६ मिनिटांची सर्वात गाढ झोप म्हणजे रॅपिड आय मुवमेंट आरईएम सर्वात जास्त गरजेची आहे. 

● पुरेश्या झोपेमुळे लठ्ठपणा, हृदयरोग आदी आजारांपासूनच बचाव होत नाही तर तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा त्यातूनही लवकर बरे होता.  

● कम्प्युटरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे शॉर्ट-वेवलेंथ प्रकाश उत्सर्जित करतात. ही ब्लु लाईट संध्याकाळच्या वेळी झोप येण्यासाठी गरजेचे असणाऱ्या मेलाटोनिन हार्मोमला कमी करते. ही स्लो वेव्स आणि आरईएम च्या काळालाही कमी करते.

● झोपेचे ४ चक्र, शेवटचे २ चक्र शरीराच्या रिकव्हरिसाठी गरजेचे:

- पहिले चक्र: नॉन रॅपिड आय मूवमेंट म्हणजेच NREM स्टेज १- तुम्ही झोपल्यानंतर ही अवस्था सुरु होते. ती जवळजवळ २० मिनिटे असते.

- दुसरे चक्र: NREM स्टेज २- झोपेचा हा काळ रात्रीच्या पुर्ण झोपेच्या ५० टक्के असतो. या अवस्थेते मेंदु स्लो व्हेव्ज किंवा डेल्टा तरंग प्रवाहित करते.

- तिसरे चक्र: NREM स्टेज ३- झोपेच्या या अवस्थेला गाढ झोप म्हटले जाते. शरीराच्या रिकव्हरी आणि विकासासाठी ही अवस्था अत्यंत महत्त्वाची आहे.

- चौथे चक्र: रॅपिड आय मूवमेंट म्हणजेच REM- झोपेच्या या अवस्थेमध्ये सर्व स्नायू व पेशी रिलॅक्स झालेले असतात. श्वासोच्छवास अनियमित होतो व स्वप्न पडायला सुरुवात होते. हे आपल्या झोपेचे सर्वात शेवटचे व महत्वाचे चक्र असते.


Source - LetsUp App