शरीरासाठी फायदेशीर ठरतो कारल्याचा रस



वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्यांसाठी कारल्याचा रस हा फायदेशीर ठरतो. कारल्याचं रस किंवा ज्यूस आपल्या वजनाला कमी करण्यात आपली मदत करू शकतो.

या व्यतिरिक्त त्याचे अनेक फायदे आहेत.चला तर मग जाणून घेऊ या.

● दररोज कारल्याचं रस प्यायल्यानं जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो.

● कारलं दमा आणि फुफ्फुसांच्या संक्रमणाच्या उपचारासाठी प्रभावी आहे.

● कारल्याचं रस मधुमेहाच्या रोगासाठी देखील फायदेशीर आहे.

● चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम देखील कारल्याचं रस करतो.

● जर आपण याचे नियमित सेवन करता,तर कारलं शरीरात रक्त शुद्ध करण्याचे काम करतो.

● त्वचेला उजळतो,मुरूम,पुळ्या,पुटकुळ्या इत्यादी समस्यां नाहीशी करतो.