जाणून घेऊया केसतोड वर घरगुती उपाय



💁🏻‍♂️ केसतोड ही त्वचासंबंधीत एक समस्या आहे. यामध्ये त्वचेवर लालसर रंगाचा फोड येत असतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला या समस्येवरील घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत.


👉 गरम पाण्याचा शेक :

केसतोड आलेल्या ठिकाणी गरम पाण्याचा शेक देणे, तेथे हळदीचा लेप लावणे किंवा लसूण पेस्ट लावणे किंवा एरंडेल तेल लावणे हे आयुर्वेदीक घरगुती उपाय केसतोडवर उपयुक्त ठरतात.

केसतोडची समस्या झाल्यास गरम पाण्याच्या पिशवीने फोड आलेल्या ठिकाणी थोडावेळ शेक घ्यावा. या उपायांमुळे केसतोडावर आराम मिळतो तसेच वेदना व सूज कमी होण्यास मदत होते.

👉 हळद :

चमचाभर हळदीत थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट किसतोड वर लावावी. हळदीतील आयुर्वेदिक आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे केसतोड समस्या लवकर बरी होण्यास मदत होते.

👉 लसूण :

लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्यांची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसतोडा वर लावावी. 15 मिनिटांनी पाण्याने त्याठिकाणी पुसून घ्यावे. केसतोड कमी होण्यास या उपायामुळे मदत होते.