खाण्याच्या वस्तू चुकुनही फ्रीजमध्ये ठेवू नका

 


  


ब्रेड: ब्रेड दरोजच्या वापरातील खाद्यपदार्थ आहे. अशामध्ये शिल्लक राहिलेले ब्रेड अनेक लोक फ्रीजमध्ये ठेऊन देतात. जेणेकरून त्याचा दुसऱ्या दिवशी वापर केला जावा. पण फ्रीजमध्ये ब्रेड कधीच ठेऊ नये. कारण फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने त्याचा ओलावा पूर्णपणे कमी होतो आणि त्याचबरोबर याचा स्वाददेखील खराब होतो. असे ब्रेड आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. यामुळे पचनासंबंधी आजार होऊ शकतात.

बटाटा: काही लोक इतर भाज्यांसोबत बटाटा देखील फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रीजमधील अधिक थंड तापमानामुळे बटाट्यातील स्टार्च शुगरमध्ये बदलते जे आरोग्यासाठी नुकसानदायक असते. खासकरून डायबिटीजच्या रुग्णांनी फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटाट्याचे सेवन करू नये.

केळे: फळांना अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी लोक त्यांना फ्रीजमध्ये ठेवतात तर काही फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात जसे कि केळे. केळे नेहमी सामान्य तापमानात ठेवले पाहिजे कारण फ्रीजमध्ये केळे ठेवल्याने ते लवकर काळे पडू लागते आणि त्याचबरोबर त्याचा स्वाद देखील बदलतो. केळीला सडन्यापासून वाचवण्यासाठी याला त्याच्या देठाला नेहमी प्लास्टिकच्या पॉली बॅगने झाकून ठेवावे.

लोणचे: जर तुम्ही लोणचे देखील फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सावधान व्हा कारण फ्रीजमध्ये ठेवलेले लोणचे लवकर खराब होते. वास्तविक लोणच्यामध्ये विनेगर असते जे अधिक थंड टेंपरेचरमध्ये लोणच्याला लवकर खराब करते. अशामध्ये लोणचे सुरक्षित ठेवण्यासाठी याला रूम टेंपरेचरमध्येच ठेवले पाहिजे.

टोमॅटो: टोमॅटो देखील फ्रीजमध्ये ठेऊ नयेत, कारण खूप कमी तापमानामध्ये टोमॅटो राहिल्याने त्याचा स्वाद खराब होतो आणि ते लवकर बिलबिलीत पडतात. असे टोमॅटो आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

कॉफी: कॉफी देखील फ्रीजमध्ये ठेऊ नये. कारण कॉफीला फ्रीजमध्ये ठेवल्याने ते फ्रीजमध्ये असलेले दुसरे खाद्य पदार्थ जसे भाजी ई. चा स्वाद शोषून घेते आणि यामुळे पूर्ण कॉफी खराब होते.

मध: फ्रीजमध्ये मध स्टोर करून ठेवल्याने कमी तापमान असल्यामुळे ते गोठते आणि याच्या स्वादामध्ये देखील परिवर्तन होते. तर मध फ्रीजमध्ये न ठेवता ते सामान्य तापमानामध्ये ठेवल्यास ते अनेक वर्षे सुरक्षित राहते.