लसीकरणाबाबत मनात काही प्रश्न आहेत ? जाणून घ्या लसीकरणाविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं
देशभरात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ वर्षा वरील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान पुढीलप्रमाणे काही काळजी घेणे गरजेचे आहे.
●कोरोना लस किती सुरक्षित आहे ?
उत्तर: कोरोना लस इतर आजारांवरील लसींप्रमाणेच सुरक्षित आहे.
● महिला मासिक पाळीमध्ये लस घेऊ शकतात का ?
उत्तर: होय.
● गरोदर महिलांनी लस घ्यावी का ?
उत्तर: गरोदर महिलांनी लस घेऊ नये.
● बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांनी लस घ्यावी का ?
उत्तर: या संदर्भात काही सूचना जारी करण्यात आलेल्या नाही. मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
● मधुमेह , उच्च रक्तदाब, थायरॉईड कमी किंवा जास्त होण्याच्या आजार असल्यास लस घेणे सुरक्षित आहे का ?
उत्तर: होय.
● * रक्त पातळ होण्यासाठी उपचार सुरू असल्यास लस घेणे सुरक्षित आहे का ?
उत्तर: लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
● २ आठवड्यांपूर्वी कोरोना झाला असल्यास आता लस घेता येऊ शकते का ?
उत्तर: नाही, कोरोना निगेटीव्ह आल्यानंतर १५-२० दिवसांनंतर लस घ्यावी.
● * कोणती लस चांगली आहे ? कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन
उत्तर: जी तुम्हाला उपलब्ध होईल ती लस घ्यावी.
● दोन आठवड्यांपूर्वी रक्तातील प्लाज्मा दान केल्या असतील तर आता लगेच लस घेऊ शकतो का ?
उत्तर: होय.
●लस घेतल्यावर रक्तदान करता येते का ?
उत्तर: नाही, लस घेतल्यानंतर तुम्ही पुढील ६० दिवस रक्तदान करू शकत नाही. यासाठी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणे करून पुढील दोन ते तीन महिने रक्ताची कमतरता भासू नये.
● लसीचे काही दुष्परिणाम होतात का ?
उत्तर: लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, इंजेक्शन घेतलेली जागा दुखणे, स्नायू दुखणे, लस घेतल्या नंतर कोरोना देखील होऊ शकतो. मात्र त्रास कमी होतो आणि मृत्यूचा धोका टळतो.
● कॅन्सरचे उपचार घेत असताना लस घेणे सुरक्षित आहे का ?
उत्तर: होय मात्र लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
● लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ?
उत्तर: लस घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच मास्कचा वापर, सोशल डीस्टन्सिंगच पालन, वारंवार हात धुणे त्याचबरोबर 500MG ची पँरासिटीमॉल गोळी घ्यावी.
● लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी ?
उत्तर: लस घेतल्यानंतर नेहमीप्रमाणेच मास्कचा वापर, सोशल डीस्टन्सिंगच पालन, वारंवार हात धुणे. ही काळजी घ्यावी.
● लस घेतल्यानंतर देखील कोरोना नियमांच करावे लागेल तर लसीचा उपयोग काय ?
उत्तर: लस घेतल्यानंतर देखील मास्कचा वापर, सोशल डीस्टन्सिंगच पालन, वारंवार हात धुणे. या कोरोना नियमांचं करावे लागेल. कारण; लस घेतल्यानंतर देखील कोरोना होतो मात्र तुम्हाला होणारा त्रास लस घेतल्यामुळे कमी होतो आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याची गरज भासत नाही.
● लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा, दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे का ?
उत्तर: होय लसीचा दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस ८ आठवड्यानंतर तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ६ आठवड्यांनंतर घ्यावा.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
टिप्पणी पोस्ट करा