जाणून घ्या केळीत असलेले औषधी गुण



● केळी हे अत्यंत उपयुक्त फळ मानले जाते व हे फळ भारतात वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असते. 

● पिकलेल्या केळापेक्षा कच्चं केळं जास्त औषधी असतं. 

● प्राचीन काळापासून आयुर्वेदात अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केळाचा वापर होताना दिसतो.

● कच्चं केळं खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल. 

● कच्च्या केळात व्हिटॅमिन बी ६चं प्रमाण जास्त असतं. एक कप उकडलेल्या केळामध्ये ३९ टक्के व्हिटॅमिन बी ६ असतं.

● कच्च्या केळाच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि अँनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो.