मोफत श्रवण आणि वाचा तपासणी शिबिराचे आयोजन - अहमदनगर
रविवार दि. 12 डिसेंबर 2021 रोजी व्हिआर स्पीच थेरपी & हिअरिंग क्लिनिक मोफत श्रवण आणि वाचा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध समस्यांवरील तपासणी तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या तपासणीत ऐकू कमी येणे, कानातून आवाज येणे, दूरचे आवाज ऐकू न येणे, गोंगाटाच्या ठिकाणी स्पष्ट ऐकू न येणे, श्रवणयंत्रातून अस्पष्ट आवाज येणे यासोबतच लहानमुलांच्या वयानुसार तोतरेपणा, बोबडेपणा, स्वमग्नता, स्ट्रोक नंतर आलेले वाचेचे बधिरत्व या समस्यांवर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात डॉ. विलास राठोड हे ऑडिओलॉजिस्ट तज्ञ म्हणून कानाच्या सर्व तपासण्या करणार आहेत.
या शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत 0241355 0228 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, तसेच गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लिनिकच्या संचालकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा