ही लक्षणे आहेत का? असू शकतो व्हर्टिगो आजार



● व्हर्टिगो हा आजार आता सामान्यपणे सर्व लोकांमध्ये पाहिला जातो. ह्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेणे फार महत्वाचे असते. याचा अर्थ तोल जाणे, भोवळ येण्याची शक्यता असणे असे आहे. हालचालीच्या संवेदनावर परिणाम झाल्यावर चक्कर येतात.

● या आजराच्या लक्षणांमध्ये पुढील लक्षणे असू शकतात कानात गुणगुण आवाज येणे, ऐकू न येणे, घाम येणे, चालता न येणे, डोळ्याच्या असामान्य हालचाली, बोलताना अडथळा निर्माण होणे, हातापायात अशक्तपणा येणे 

● तसेच या आजराच्या कारणांमध्ये पुढील करणे असू शकतात जसे की स्ट्रोक, मधुमेह मिलिटस, डोक्यावर इजा, रक्तवाहिन्यांचा आजार, अर्धशिशी. या आजाराचे उपचार करण्यासाठी डॉक्टर्स विविध तपासण्या करून घेतात जसे कि सिटीस्कॅन, एमआरआय, डोळ्याच्या हालचाली मोजणे.

● या रुग्णांवर काही औषधोपचार केले जातात ज्यामध्ये चिंता विरोधी औषधे, व्यायाम, स्नायूंना आराम देणे, चाल स्थिर करण्यासाठी व्यायाम आणि अशा बऱ्याच गोष्टी. योग्य वेळेत उपचार घेतले तर हा आजार नक्की बारा होऊ शकतो.