अशी घ्या कानाची काळजी - Take care of your ears

Google pic


कानात अतिप्रमाणात घाण (Ear wax) जमा झाल्यास ती काडून टाकणे/घेणे गरजेचे. व ते पण तज्ञांकडूनच. पण ह्यासाठी Earbud सारख्या गोष्टी कधीही वापरू नयेत. Earbuds घातल्यामुळे कानाच्या कडेचा (margin) मळ साफ होत ही असेल पण त्याच्या (Earbud) पुढच्या टोकासमोर असलेला मळ अजूनही पुढे ढकलला जातो व ती मळकानाच्या पडद्याला (ear drum)लागून इजा पोहचवू शकतो. पडद्याला सूज येणे, पडदा फाटणे सारखे विकार होऊ शकतात. हे आपल्या लक्षात येत नाही. तरीही थोड्या प्रमाणात कानाचा मळ (Ear wax) असावा कानामध्ये. ही काही विकृती नव्हे. कानातली मळ ही कानातील Sebaceous & Ceruminous Glands च्या प्राकृत स्रावांपासून बनत असते व त्यामुळेच कानाला एक प्रकारचे आतून संरक्षण मिळते. ही मळ कानाचे मोठा आवाज होणे, पाणी/कीडा कानात आत जाणे सारख्या गोष्टींपासून बचाव करते.

Google pic
कानांचे दुखणे हे डोके दुखणे, दात किडणे/दात दुखणे यामुळे सुद्धा होऊ शकते. फटाक्यांचा आवाज हा सुद्धा कारणीभूत ठरतो. जसे वय होत जाईल तसे ऐकु येण्यावर पण फरक पडत जातो. ज्यांना कमी ऐकु येते ती माणसं उच्च स्वरात/आवाजात बोलतात हे स्वाभाविक असते. अपघाताने कानाच्या पडद्याला मार बसल्याने पण बहिरेपणा येऊ शकतो. जन्मापासूनच कानाची एखादी विकृती जशी की कानाचा आकार व कानाचे छिद्र लहान असणे ह्यांचे सुद्धा परीक्षण महत्वाचे. कानात जर स्राव (discharge) असेल तर तो तज्ञ वैद्यांकडूनच पूर्ण साफ करून उपचार घेतलेले बरे. जरा देखील स्राव कानाच्या आत राहिल्यास त्रास पुन्हा होऊ शकतो. कानामुळे चक्कर सुद्धा येऊ शकते.
Google pic

खूप गोंगाट असणाऱ्या आवाजाच्या ठिकाणापासून लांब राहा. त्यासःती वातावरणातील आवाजाची पातळी किती आहे, हे समजून घ्या. जर ट्रॅफिकमध्ये तुम्हाला जास्त वेळ राहावं लागत असेल तर इयरप्लग लावा. ट्रॅफिक हे सुद्धा गोंधळाचं एक रूप आहे, जे आपल्या कानांसाठी चांगलं नसतं. जर तुम्ही एखाद्या कारखान्यात मोठया आवाजात काम करत असाल तर कानांच्या सुरक्षिततेसाठी इयरप्लगचा वापर करा. जर वातावरणातील आवाज तुमच्यासाठी असह्य असेल तर अशा वातावरणातून काही वेळासाठी दूर जा.



Take care of your ears

Google pic


If excessive ear wax accumulates in the ear, it should be removed. And that too from experts. But never use things like Earbud for this. Applying earbuds may clear the margin of feces, but feces in front of the front end of the earbud are still pushed forward and can injure the ear drum. Disorders like swelling of the membrane, rupture of the membrane can occur. You don't notice it. However, there should be a small amount of ear wax in the ear. This is not a distortion. Earwax is made from the natural secretions of the Sebaceous & Ceruminous Glands in the ear and thus provides a kind of inner protection to the ear. This feces protects the ear from loud noises, water / insects getting into the ear.

Earaches can also be caused by headaches, tooth decay / toothache. The sound of firecrackers also causes this. As you grow older, your hearing may change. It is natural for people who can hear less to speak louder. Accidental blow to the eardrum can also cause deafness. It is also important to check for ear defects from birth, such as ear size and small ear canal. If there is discharge in the ear, it is better to get it cleaned and treated by an expert doctor. If the discharge stays inside the ear, the problem may recur. Ears can also cause dizziness.

Stay away from places where there is a lot of noise. Understand the level of noise in the atmosphere. If you have to stay in traffic for a long time, wear earplugs. Traffic is also a form of confusion, which is not good for your ears. If you are working loudly in a factory, use earplugs for ear protection. If the noise in the atmosphere is unbearable for you, stay away from such environment for some time.