🌳 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना Dr. Shyamaprasad Mukherjee Jan-Van Vikas Yojana



⚡ गावांतील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न / उत्पादकता, रोजगार संधी वाढविणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी कारणे.


🧐 योजनेच्या प्रमुख अटी :

▪ बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उदयान / अभयारण्याच्या सिमेपासून 2 कि.मी. चे आत येणा-या गावांचा समावेश योजनेत करावा.

▪ या योजनेतंर्गत केलेल्या कामांचा तपशील तसेच प्रस्तावित कामांपुरता आरखडा तयार करणे.

▪ गाव निवडताना गाव समूह तत्व अवलंब करणे.


📄 आवश्यक कागदपत्रे : सूक्ष्म आराखडा.


💁‍♂ लाभाचे स्वरूप असे :


1. गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगाराविषयी प्रशिक्षण देणे, क्षमता बांधणी करणे व रोजगाराची संधी. 


2. उपलब्ध करून देणे, याकरीता औद्योगिक तज्ञांच व पर्यटन संस्थांचा सहभाग घेणे, गौण वनउपज संकलन, मुल्यवृध्दी व विक्रीस सहाय्य करणे.


3. निसर्ग पर्यटन व गृह पर्यटनाचा विकास करणे, अनुषंगिक क्षमता बांधणी करणे, प्रशिक्षण देणे.

पशु संसाधनांचा विकास, कृषि संसाधनांचा विकास, शौचालय, मैला प्रक्रिया.


4. जल संसाधनांचा विकास.


🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्रपाल.


📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)