दातांचा पिवळेपण दूर करायचा; जाणून घ्या टिप्स



💁🏻‍♂️ चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि धूम्रपान तसंच तंबाखूसारख्या वाईट सवयींमुळे दातांचं आरोग्य धोक्यात येतं. यामुळे तुमच्या दातांचा रंग पिवळा होतो. 

🦷 चला तर मग जाणून घेऊया दातांना स्वच्छ पांढरं करण्याचे काही उपाय

👉 केळ्याचं साल : 

रोज रात्री झोपायच्या आधी केळ्याच्या सालीचा आतला भाग दातांवर 2-3 मिनिटं घासावं. त्यानंतर कोमट पाण्याने दात धुवा. केळीच्या सालीमध्ये असलेलं मिनरल्स आणि पोटॅशियम दातांमधील घाण साफ करतात. 

👉 बेकिंग सोडा आणि लिंबू :

दात स्वच्छ करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोड्या मध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळून 2 ते 3 मिनिटं दातांवर लावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने दाते धुवा आणि झोपा. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस दातांवरील डाग साफ करू शकतो.

👉 हळद :

रोज रात्री झोपायच्या आधी हळद पावडरने ब्रश करा. 2 ते 3 मिनिटांनी माऊथवॉश करा. दातांमधून पिवळेपणा दूर करण्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे.