रक्ताच्या गुठळ्या? जाणून घ्या, कारणे आणि उपाय



● रक्तवाहिनीत रक्ताच्या लहान लहान गुठळ्या तयार होतात. ज्यामुळे रक्तप्रवाह रोखला जातो. खासकरुन या गुठळ्या हृदय व मेंदूला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतं.


रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणे

● ज्या व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारचे आजार आहेत अशा व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण अधिक असतं.

● ज्या व्यक्तींची शारीरिक हालचाल कमी असते.

● एखादी दुखापत झाली असल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यास अशा व्यक्तींमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

● काही रोग असल्यास रक्ताची गुठळ्या होऊ शकतात. शरीराच्या खोल नसामध्ये रक्त गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.


रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी काय करता येईल?

● सतत बसून न राहता सक्रिय राहिल्यास रक्त गोठण्यासंबंधीचा धोका कमी केला जाऊ शकतो. 

● नियमित व्यायाम करा. बरेच तास एकाच जागी बसणे टाळा.

● लठ्ठपणासारख्या समस्येमुळे लोकांमध्ये रक्त गोठण्याचा धोका वाढतो.

● धूम्रपान करू नका. धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते आणि रक्त गोठण्याची शक्यता वाढू शकते.

● तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि काही कर्करोगाच्या उपचारांकरिता घेण्यात येणारी काही औषधे रक्त गोठण्याचा धोका वाढवू शकतात. हे टाळावे.