आय व्ही एफ देते! निसंतान दांपत्यांना बाळाचे हसू पाहण्याचे सुख



 आय व्ही एफ देते! निसंतान दांपत्यांना बाळाचे हसू पाहण्याचे सुख

डॉ.सुप्रिया वीर स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ

डॉ.निलोफर धानोरकर स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ

जगभरात ८० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे, ज्यांचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे झालेला आहे. जगभरात दरवर्षी जवळपास ५० हजार पेक्षा अधिक बालकांचा जन्म या प्रक्रियेद्वारे होतो. हा आकडा दरवर्षी जन्म घेणाऱ्या १३ कोटी बालकांच्या ०.३ टक्के आहे. डॉक्टर्सच्या मतानुसार हे तंत्रज्ञान आता मुख्य धारेचा भाग झाले आहे आणि दांपत्यांसाठी वरदान ठरले आहे.


ज्या दांपत्यांना काही कारणामुळे अपत्य होत नसेल त्या दांपत्यांसाठी इन विट्रो पर्टिलायजेशन (आय.व्ही.एफ.) आजच्या काळात सर्वांत मोठा आशेचा किरण आहे. अशा वेळी या तंत्रज्ञानाचा विचार करणाऱ्या दांपत्यांना या तंत्रज्ञानातून बऱ्याच प्रमाणात यश मिळत आहे ही एक अशी प्रक्रिया आहे जी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नोलॉजी (ए.आर.टी.) शी संबंधित आहे. या प्रक्रियेद्वारे इन फर्टिलिटीची समस्या दूर केली जाते. यात शरीराच्या बाहेर एग व स्पर्म प्रयोगशाळेत फर्टीलाइज केले जातात आणि एम्ब्रोय (भ्रूण) पातळीला आल्यानंतर त्याच महिलेच्या गर्भाशयात स्थापित केले जातात. एआरटीशिवाय इतर अनेक पद्धती

आहेत. उदाहरणार्थ गेमिट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर आणि जायगोटे इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर अपत्य होण्याच्या उपचाराकरिता आयव्हएफचा वापर केला जातो. अवरोधित किंवा फॅलोपियन ट्युबच्या क्षतिग्रस्त झाल्यास, स्पर्मची संख्या किंवा गतीशिलतेमध्ये कमतरता आल्यास, महिलांमध्ये ओवुलेशनची समस्या, त्या महिला ज्यांची फॅलोपियन ट्युब काढून टाकण्यात आलेली आहे किंवा ते लोक ज्यांच्यात अनुवंशिक आजार आहेत. त्यांच्यासाठी आयव्हीएफ एक यशस्वी तंत्रज्ञान सिद्ध झाले आहे.


यश अनेक बाबींवर अवलंबून

आयव्हीएफची यशस्विता दर प्रजनन इतिहास, आईचे वय, अपत्य न होण्याचे कारण आणि जीवनशैली या बाबींवर अवलंबून आहे असे होऊ शकते की, महिलेमध्ये निरोगी बीजाची निर्मिती होत नसेल आणि पतीदेखील या संबंधात निरोगी नसेल तर अशावेळी दांपत्य डोनर,

एम्ब्रॉयची निवड करु शकतात आणि सामान्यपणे एम्ब्रियो (भ्रुण) ची संख्या एग व महिलांच्या वयावर अवलंबून आहे. महिलांच्या वयाच्या आधारावर आरोपणाची संख्या निश्चित केली जाते. या सर्व गोष्टीविषयी अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


पाच चरणांमध्ये होते ही प्रक्रिया


स्टेप १:


प्रजननाच्या औषधींचा उपयोग बीजाची निर्मिती प्रक्रिया वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळे बीजाला विकसित करता येते. या प्रक्रियेत अनेक बिजांची आवश्यकता असते कारण की काही बीज योग्यप्रकारे विकसित व फलित होत नाहीत. अल्ट्रा साऊंडच्या माध्यमातून अंडाशयाची तपासणी केली जाते. आणि रक्ताच्या तपासणीतून हार्मोन्सचा स्तर बघितला जातो.


स्टेप २ : या पायरीवर एका छोट्याशा सर्जरीमध्ये एका निरंक सुईद्वारे पोल्विक कॅविटीमधून बीज बाहेर काढले जातात आणि अॅक्टव्ह बीजांना शरीरात ठेवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेस अल्ट्रासाऊण्ड इमेजिंगद्वारे पाहाता येते. या दरम्यान त्रास कमी करण्यासाठी औषधीचा उपयोग केला जातो.


स्टेप ३ : पुरुषाच्या स्पर्मचा एक नमुना घेऊन लॅबमध्ये महिलांच्या बीजासोबत निषेचित केले जाते.


स्टेप ४ : भ्रुण वैज्ञानिकांद्वारे चांगल्या भ्रूणांची निवड केली जाते.


स्टेप ५ : सामान्यपणे एम्ब्रॉयची निर्मिती ३ ते ५ दिवसानंतर होते. विशेष करून जेव्हा फर्टिलायजेशन होते. भ्रुणाला गर्भाशयात टाकण्यासाठी एक कॅथेटर किंवा पातळ ट्यूबचा वापर केला जातो.


पती-पत्नी दोघांची तपासणी आवश्यक


सामान्यबणे नि संतानतेसाठी महिलांना दोष दिला जातो. छोट्या शहरांमध्ये तर पुरुषांची तपासणी देखील केली जात नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार मागील काही काळात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नि:संतानतेची प्रकरणे वाढली आहेत. कॅनडामध्ये दोन संशोधन झाली. १९८४ मध्ये १८ ते २९ वयामध्ये ५ टक्के जोडपे वंध्यत्वग्रस्त भेटले ती संख्या २०१० मध्ये वाढून १३.७ टक्के झाली होती. डॉक्टरांच्या अनुसार वंध्यत्वाची तपासणी शक्य तितक्या लवकर करायला हवी कारण की वाढत्या वयासोबत आयव्हीएफच्या यशस्वीतेचा दर देखील कमी होऊन जातो काही काळापूर्वी भारतामध्ये एका सर्व्हेनुसार आकड्यांमध्ये आश्चर्यकारक बातम्या समोर आल्या.


यामध्ये आढळून आले की ३१-४० वर्षाची ४६ टक्के लोक अपत्य प्राप्तीसाठी आयव्हीफ तंत्रज्ञानाचा वापर करु इच्छितात. यामध्ये दक्षिण भारतीयाचे प्रमाण ४९ टक्के होते. ९ शहरांमध्ये २५६२ लोकांमध्ये हा सर्व्हे केला गेला होता. एका इतर सर्व्हेमध्ये ३१-४० वर्षे वयाच्या ६३ टक्के जोडपी पालक बनण्यास समर्थ नव्हते. आणखी एका रिपोर्टनुसार २१-३० वयाच्या ३४ टक्के जोहप्यांमध्ये नैसर्गिक पध्दतीने गर्भधारणा करण्यास अडचण येत होती. एकूण बघता आयव्हीएफच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातील ७५ टक्के लोक सुरक्षित मानले जातात.