शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात 'हे' सुपरफूड



💁‍♂️ प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही विशेष पोषकतत्वांची आवश्यकता असते. 

👍 आजारांपासून वाचण्यासाठी स्वताला फिट ठेवण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या सुपरफूडचा करावा ते जाणून घेवूयात…

▪️ दूध आणि दही : दूध आणि दही हे प्रोटीन, कॅल्शियम आणि ल्यूटिनचा चांगला स्त्रोत आहे. दुधात अमीनो अ‍ॅसिड, आणि दह्यात प्रोटीन, पोटेशियम आणि गुड बॅक्टेरिया असतात.

▪️ फॅटी फिश : हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असलेले सॅलमन, हेरिंग, सार्डिन आणि हलिबेट मासे सेवन करावे. यात प्रोटीन आणि पोषकतत्व असतात.

▪️ चॉकलेट : शरीरात ब्लड फ्लो चांगला ठेवण्यासाठी चॉकलेटचे सेवन करावे. विशेषता डार्क चॉकलेटमधील फ्लेवनॉलमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात. ब्लड सर्कुलेशन चांगले होते.

▪️ सोया फूड्स : सोया फूड्स लाभदायक आहे. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. एस्ट्रोजन हार्मोन वाढतात. आहारात सोयाबीन, टोफू, सोया दूध आणि मीसो सूपचा समावेश करावा.

▪️ अंडे : अंड्याचे भरपूर सेवन करावे. यात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि ल्यूटिन असते.