सतत तोंड येतंय...तर करा हे उपाय
तोंडात एखादा फोड येणे किंवा अल्सर होणे, याला आपण बोली भाषेत तोंड येणे असं म्हणतो. वारंवार होणारा हा त्रास खूपच भयंकर असतो. काही खाल्लं किंवा अगदी पाणी प्यायलं तरी खूपच वेदना होतात. हा त्रास होऊ नये यासाठी आपण खालील उपाय आपल्याला फायदेशीर ठरू शकतात.
हे आहेत घरगुती उपाय :
१. कोथिंबीरीचा रस काढा. एखादा चमचा रस तोंडात घ्या आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवा.
2. चूळ भरल्यासारखे करा. दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास एक दोन दिवसातच आराम पडेल.
२. विलायची पावडर आणि मध एकत्र करून घ्या. हे मिश्रण तोंड आले असेल, तेथे लावा.
३. पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्या. कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या करा.
4. पेरूची एकदम रापलेली आणि अतिशय कोवळी अशी दोन्ही प्रकारची पाने घेऊ नका. मध्यम स्वरूपाची पाने घ्या.
5. वेळेस हा प्रयोग केला तरी हरकत नाही. पटकन आराम वाटेल.
6. तुळशीची ४ ते ५ वेळेस तुळशीची ५- ५ पाने बारीक चावून खा.
7. खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्यानेही तोंडातील जखमा कमी होतात.
टिप्पणी पोस्ट करा