जगा आत्मविश्वासाने



आपण रोज आत्मविश्वास ( confidence) हा शब्द ऐकतो. कुठलीही गोष्ट साध्य करण्या साठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. आज आपण अगदी सोप्या भाषेत आत्मविश्वास कसा आपण वाढवू हे पाहूया.

  आज आपल्या आयुष्यात आत्मविश्वास तेवढाच महत्वाचा आहे जेवढा शरीरात आत्मा असणं. आत्मविश्वास असल्या शिवाय आपण आयुष्याच्या कुठल्याच भागात यशाची कल्पना करू शकत नाही. आत्म विश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे असं आपण म्हणू शकतो. आज आपण आत्मविश्वासा च्या  जोरावर कठीण वाटणारे ध्येय देखील अगदी सहज गाठू शकतो. आणि जर आत्मविश्वास कमी असेल तर व्यक्ती स्वतःच्या प्रत्येक गोष्टी वरच संशय घेते,  नवीन गोष्टी करायला घाबरते. आत्मविश्वास ज्या व्यक्ती कडे असतो त्या व्यक्तीची वेगळीच छाप इतरांवर पडते. अश्या व्यक्ती धाडसी,  सय्यमी, वाचनबद्द असतात.


10 टिप्स आत्मविश्वास वाढवण्यासाठी 

1- स्वतः चि स्तूती करा - आपण नेहमी दुसऱ्या च कौतुक करतो, पण आपण स्वतः च ही कौतुक केल पाहिजे, आयुष्यात मिळालेलं यश, बक्षीस, झालेलं कौतुक आठवल पाहिजे. वाईट परिस्तिथीत हे औषधा सारखं कामं करत. म्हणून स्वतःला चांगलं समजा. स्वतःची स्तुती करा. स्वतःच्या असण्यावर आणि दिसण्यावर प्रेम करा.

2- सकारात्मक राहणे, हाती घेतलेल कामं करू शकू,  करता येणं सहज शक्य आहे असं नेहमी स्वतःला सांगा.  स्वतःशी सकारात्मक बोला. सकारात्मक शब्द सकारात्मक भावना निर्माण करतात. म्हणून स्वतःशी सकारात्मक बोला. 

3- नेहमी आपल्या योग्य कपडे परिधान करा. स्वच्छ आणि टाप - टीप राहण्याचा प्रयत्न करा. आपला पोशाख हा आपला व्यवसाय नोकरी याला शोभावा असा असेल या कडे लक्ष द्या. 

आपला पोशाख देखील आत्मविश्वासात भर घालतो.

4- भीती वर विजय मिळवा,   प्रत्येक गोष्ट शक्य आहे,  जर ते करू शकतात तर मी  का नाही?  स्वतःला एकदा जरूर विचारा. खूप लोकांना नवीन गोष्टी करताना भीती वाटते त्या गोष्टी नक्की करा ( चांगल्या गोष्टी ) अपयशाच्या भीतीने स्पर्धेत उतरणं सोडू नका. अपयश गरजेचं आहे त्या शिवाय यश हाताळता येणं अश्यक्य आहे.

5- वर्तनामात जगा,  भूतकाळाचा विचार जरूर करा पण काही शिकण्यासाठी,  वाईट वाटून घेणं किव्वा पश्चाताप करण्या साठी नाही. भविष्याची चिंता करू नको आजच कर्म उद्याच भाग्य ठरवत. So Relax

6 - स्वावलंबी बना,  जेवढं होईल तेवढं हाती घेतलेलं कामं एकट्याने करण्याचा प्रयत्न करा,.  कुणाचीही मदत न घेता.  असं केल्याने स्वतःच्या क्षमता आणि संयम याची जाणीव माणसाला होते. 

7 - आपली आवड नेमकं कोणत्या कामात आहे ते शोधा, तेच कामं करा किव्वा मग त्या कामात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा विशेषतः अभ्यासाची मुलांना आवड नसते पण तो गरजेचं असत.

8 - चिंता करू नका,  कारण एका मर्यादे पलीकडे आपल्या हातात काही नाही हे नेहमी लक्षात ठेवा,  आणि परिणामा पेक्षा कामावर फोकस करा.  अडचणींना संधी समजा,    म्हणजे चुका समजतील आणि पुढच्या वेळी कामं अजून चांगलं होईल.  

9 - आत्मविश्वास मिळवण्यासाठी दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या समस्यांना विश्वासाने समोर जा झालेल्या चुका स्वीकार,  चुकांमधून  शिका.  रोजच्या रिअल टाइम्स प्रॉब्लेम मधूनच शिकण्याचा प्रयत्न करा. आणि पुढ जा.  

10-  जबादारी घ्या  घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची जबादारी स्वीकारून पुढे काय करता येईल,  याचा विचार आपण करू शकतो. शेवटी जो चुकतो तोच शिकतो ही म्हण काही खोटी नाही. जाबदारीची जाणीव आणि जाबदारीचा स्वीकार याने आपला आत्मविश्वास वाढवतो. 

मी सांगितलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा.. 

Thank you..