तुमचं लसीकरण केंद्र खरं आहे की बनावट?



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षावरील सगळ्यांना मोफत लस देण्याचं जाहीर केले आहे. 

लसीकरण मोहिमेला वेग यावा यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्नशील आहे. तुम्ही ज्या केंद्रावर लसीकरण करत आहात ते खरं आहे की बनावट? याची चिंता तुम्हालाही असेलच. लसीकरण करून घेताना कोणती काळजी घ्यावयाची जाणून घ्या.


काय आहे व्यवस्था? :

▪️ केंद्र सरकार लस खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देत आहे. खासगी हॉस्पिटल थेट उत्पादन कंपन्यांकडून लस खरेदी करत आहेत. 

▪️ जर कोणतीही संस्था खासगी हॉस्पिटलसोबत मिळून लसीकरण शिबीर सुरू करत असेल तर त्याठिकाणी लस खासगी हॉस्पिटल उपलब्ध करून देईल. 

▪️ लस देण्यासाठी त्या हॉस्पिटलचे कर्मचारी आणि डॉक्टर्सही येतील. लसीकरणासाठी निवडलेली जागा पर्याप्त जागा आहे का? लस ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था आहे का? याची खातरजमा राज्य सरकार करून घेते. 

▪️ दिल्ली प्रेस क्लबमध्ये दिल्ली सरकार आणि खासगी हॉस्पिटलच्या सहाय्याने कॅम्प लावला होता. यासाठी सर्व परवानगी आणि कागदपत्रे तपासून घेतले जातात.


अशी घ्या काळजी? :

▪️ जर कोणत्या शिबिरात तुम्ही लसीकरण करण्यासाठी जात असाल तर ते सरकारकडून आहे की खासगी हॉस्पिटलकडून? त्याची माहिती करून घ्या. 

▪️ हॉस्पिटलकडून असेल तर संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून कॅम्पबद्दल खातरजमा करा. 

▪️ आरोग्य खात्याकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करायला हवी असं तज्ज्ञ सांगतात. 

▪️ त्याचसोबत ज्याठिकाणी लसीकरण शिबीर लागेल तिथे मोठ्या बोर्डावर सर्व परवाने, कागदपत्रे ठळक बोर्डावर चिटकवायला हवीत. 

▪️ स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही शेअर करायला हवा कारण यामुळे लोकांना संशय आल्यास ते याबाबत चौकशी करू शकतील. 

▪️ जिथे कॅम्प लागणार आहे तेथील स्थानिक पोलिसांनी सर्व परवानग्या घेतल्या आहेत की नाही याचा तपास करावा. 


▪️ लसीकरण जितकं महत्त्वाचं आहे तितकचं बनावट लसीकरणापासून लोकांचे संरक्षण करणेही गरजेचे आहे