साखरेचे अधिक सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते

साखरेचे अधिक सेवन शरीरासाठी हानिकारक  ठरू शकते


● आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत...

● साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते.

● साखरेच्या अधिक सेवन केल्याने शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे शरीरावर चरबी जमा होते, आणि लठ्ठपणा वाढतो.

● साखर जास्त प्रमाणात घेतल्याने याचा थेट परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो आणि प्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

● जास्त प्रमाणात साखर घेतल्याने आपल्या लिव्हरचे काम वाढते. आणि शरीरात लिपिडचे निर्माण जास्त होते.अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर रोगासारख्या समस्या होण्याचा धोका वाढतो.

● जास्त प्रमाणात साखर घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. जी मेंदूसाठी नुकसानदायक आहे. यामुळे स्मृतीभंश देखील होऊ शकतो.

● साखरेचे जास्त प्रमाण घेतल्यावर हृदय विकाराचा झटका किंवा हार्ट स्ट्रोक सारखे त्रास देखील होऊ शकतात.