थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी काय करता येईल? वाचा!

 





थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होणारी थायरॉईडची समस्या आता अतिशय सामान्य झालेली आहे. 


यापासून वाचण्यासाठी आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील... 


● आयोडीन जास्त असणाऱ्या गोष्टी आहारात असू द्या. कारण ते थायरॉईडच्या दुष्परिणामांना रोखत आजारापासून वाचवते. 


● यासाठी मनुका, बटाटा, दूध, दही, ब्राऊन राईस आणि लसूण अशा गोष्टी खा. तसेच फळं आणि ज्यूस डाळिंब, सफरचंद, केळी, द्राक्ष, टरबूज हि फळ खा. 


● डेअरी प्रॉडक्ट्स आहारात नक्की घ्या. यात खूप जास्त जीवनसत्व, मिनरल्स, कॅल्शिअम असतं. याशिवाय रोगप्रतिकार यंत्रणेला बळ मिळतं. विविध रोगांपासून बचाव होतो.


● थायरॉईडपासून बचाव व्हावा यासाठी आहारात सी-फूड नक्की घ्या. शेलफिश, झिंगे आणि सागरी मासे नक्की खा. 


● अशा गोष्टी खा ज्यात लोह आणि तांबं अर्थात कॉपर जास्त प्रमाणात असेल. यासाठी पालक, विविध शेंगा, ब्रोकोली, लाल मांस, भोपळ्याच्या बिया, बदाम, टोफू, काजू, सूर्यफुलाच्या बिया यांचा आहारात समावेश करा.