आता एटीएममधून मिळणार औषधं आणि प्रेग्नेंसी कीट!



🏧 पैशांच्या आर्थिक व्यवहारासाठी एटीएमचा वापर केला जातो मात्र आता चक्क तुम्हाला एटीएममधून औषध आणि प्रेग्नेंसी कीट मिळणार आहे.


⏰ देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचं हे मशीन बसवण्यात येणार असून त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधं उपलब्ध होणार आहेत. 


✍️ देशामधल्या एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये असं औषधांचं मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर ही औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. 


🤝 केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये अशा प्रकारचा करार झाला आहे. 


🏕️ या माध्यमातून दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत.


💊 गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधं त्याचप्रमाणे इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि विविध प्रकारची औषधं या एटीएममधून नागरिकांना मिळणार आहेत.


👍 जाणून घ्या या एटीएमचे फायदे 

● या एटीएम मशिनमधून जेनेरिक औषधं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. 

● जेणेकरून नागरिकांना जेनेरिक औषध मिळेल. 

● या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्यांकडून औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. 

● या एटीएममुळे नागरिकांना आता पैशाप्रमाणे औषधंही 24 तास उपलब्ध होऊ शकणार आहेत.