पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती टिप्स वापर



😋 स्वादिष्ट भोजन हे प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. अनेकजण खाण्यापिण्याचे शौकिन असतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त झाले की अनेकांना पोटात गॅसची समस्या जाणवते. 

👍 चला तर मग जाणून घेऊया या समस्येवरील घरगुती उपाय 

▪️ गॅस झाल्यास केळी खावे : 

केळीचा उपयोग  अ‍ॅसिडिटीवर किंवा गॅसवर उपाय म्हणून केला जातो.  अ‍ॅसिडिटी रोखण्यासाठी केळीचा चांगलाच उपयोग होतो.

▪️ जेवणात लवंगाचा वापर :

लवंग आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. शिवाय याचे इतर अनेक फायदे असतात. गॅस कमी करण्याचे काम लवंग करते. 

▪️ भाजलेले जीऱ्याचे पाण्यात सेवन :

जिरे हे एक अ‍ॅसिड न्यूट्रलायझर आहे. जिऱ्यामुळे फक्त पचनाला मदत मिळत नाही तर पोटदुखीवर देखील आराम पडतो. 

▪️ दालचीनीचा चहा प्यावा :

दालचीनी हा एक मसाला आहे जो स्वादाबरोबरच अनेक फायदेदेखील देतो. हा नैसर्गिकरित्या पचनसाठी देखील हा उपयुक्त असून पोट शांत ठेवण्यासाठी फायदेशीर असतो.