डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘या’ खास टिप्स फॉलो करा



👁️ सुंदर जग पाहण्यासाठी डोळ्यांचे सुरक्षित असणे फार महत्त्वाचे आहे. डोळे शरीराचा महत्त्वपूर्ण आणि नाजूक अवयव आहेत म्हणून त्यांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. 


💁‍♂️ चला तर मग आज आपण जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती.

● डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.‎

● डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यानी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.

● ‎डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.

● ‎उन्हात काम करताना दर्जेदार गॉगल्स घाला.

● ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे उदा. गाजर, बीट, टोमॅटो इ. खावीत.

● ‎टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा.

● ‎कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

● ‎प्रवास करताना वाचने टाळा. ‎पुरेशी झोप व विश्रांती घ्या.