.... या कारणांमुळे भविष्यात तुम्हालाही करावी लागू शकते बायपास सर्जरी

.... या कारणांमुळे भविष्यात तुम्हालाही करावी लागू शकते बायपास सर्जरी


जगभरातील पुरूषांसह महिलांमध्ये हृदय रोगाच्या समस्यांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आकडेवारीनुसार हृदयाच्या आजारांमुळे दरवर्षी लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो.

ऑफिसचं काम, घरातील वाद, कामाचा भार, आर्थिक बाबींचा ताण अनेक महिला घेतात.  वाढत्या वयात हाच ताण आणि रोजची दगदग हृदयाच्या आजाराला कारणीभूत ठरते. डॉ उत्कर्ष अग्रवाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका आणि एनजाइनासारख्या गंभीर समस्यांनंतरही अनेक प्रगत तंत्रांद्वारे रुग्णांचे प्राण वाचवता येतात. रोगाच्या तीव्रतेनुसार, बायपास शस्त्रक्रिया किंवा कोरोनरी धमनी बायपास (CAB) ची शिफारस केली जाऊ शकते.

ज्यामुळे रुग्णाला वाचवणे सोपे होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्व प्रकारच्या उपायांचा वापर करून हृदयरोग टाळता येतो. या व्यतिरिक्त, बायपास सारख्या शस्त्रक्रिया झालेल्या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागते. 


बायपास सर्जरीची गरज का असते?

▪️ डॉ. उत्कर्ष अग्रवाल यांनी सांगितले की, रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यामुळे, हृदयाच्या स्नायूमध्ये अनेक वेळा रक्त आणि ऑक्सिजनचे संचलन थांबते किंवा कमी होते, ही स्थिती बरीच धोकादायक असू शकते. 

▪️ आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्याला बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा बायपास केला जातो.     `

▪️ हृदयविकाराचा झटका आणि एनजाइनासारख्या गंभीर आजारांच्या बाबतीत अशा शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते. शस्त्रक्रियेनंतर हृदयाची काळजी आणखी आवश्यक असते.