मातीच्या माठातून पाणी पिल्याने होतात 'हे' फायदे

मातीच्या माठातून पाणी पिल्याने होतात 'हे' फायदे


माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. म्हणूनच आजही अनेकजण मातीच्या मडक्यातून पाणी पितात. 


मातीच्या माठातून पाणी पिण्याचे बहुगुणकारी फायदे

● मातीचे गुणधर्म : माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात त्याचा तुमच्या शरीराला फायदाच होतो.

● केमिकल विरहित : अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

● मेटॅबॉलिझम सुधारते : मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

उष्माघाताला आळा बसतो : उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या. 

● घशासाठी उत्तम पाणी : सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते.