तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीवर हे घरगुती उपाय अवलंबून पहा

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीवर हे घरगुती उपाय अवलंबून पहा


सकाळी उठल्यावर आपण ब्रश करत नाही तेव्हा तोंडाला दुर्गंधी येते. तोंडाचा गुळणा न केल्याने तोंडाची दुर्गंधी येणे सामान्य बाब आहे.

काही टिप्स अवलंबवून आपण तोंडाची दुर्गंधी दूर करू शकतो. चला तर मग जाणून घेऊ काही टिप्स...

 ● ग्रीन टी मध्ये अँटीबेक्टेरिअल घटक असतात, जे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

 ● जास्त पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते आणि दुर्गंधी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 ● डाळिंबाची साल पाण्यात उकळून या पाण्याने गुळणे केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

 ● कोरडे धणे खाणे माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतात. ते चघळल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

 ● तुळशीची पाने खाल्ल्याने तोंडाचा वास दूर होतो.

 ● पुदिन्याच्या पानांचा वापर तोंडाचा दुर्गंधी दूर करण्यासही मदत करतो.

 ● तोंडात लवंग ठेवून चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि दातदुखीवरही आराम मिळतो.