स्तनपान करताना अशी काळजी घ्या!
प्रत्येक आईने स्तनपानाच्या वेळी काही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेणे करून बाळाला त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. आईने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावयाला पाहिजे?
● बऱ्याचवेळा काही स्त्रिया स्तनपान करताना फोनवर बोलत असतात हे चुकीचे आहे.
● बाळाला डावीकडील बाजूस झोपवून दूध पाजा किंवा मांडीत 65 डिग्रीच्या कोनात असावा. पायाच्या खाली उशी ठेवा. जेणे करून बाळाच्या कानात दूध जाऊ जाणार नाही. तसेच आपल्या स्तनाचा आकार देखील व्यवस्थित राहील.
● स्तनपानाच्या वेळी बाळाला झोपू देऊ नका. कारण बाळ मधूनच झोपतात त्यांचे पोट भरलेले नसते. .
● बाळाला घाईघाईत त्याला दूध पाजू नका. यामुळे त्याचे पोट बिघडू शकते.
● स्तनपान करणाऱ्या मातांना नेहमी सैलसर कपडे घालायला पाहिजे. घट्ट कपडे स्तनाची वेदना आणि संसर्गाला कारणीभूत असू शकते.
🤓 स्तनाची स्वच्छता कशी करावी? :
● स्तनाची स्वच्छता न करता बाळाला दूध पाजणे टाळावे, यामुळे त्याचे पोट बिघडू शकते.
● स्तन नेहमी कोमट पाण्याने धुऊन स्वच्छ करावे.
● स्तनाला साबण लावू नका, असे केल्याने जर स्तन व्यवस्थित स्वच्छ झाले नाही तर साबण बाळाच्या तोंडात जाऊ शकतो.
टिप्पणी पोस्ट करा