तुमच्या केसांची गळती सुरु आहे? मग 'या' गोष्टी टाळा!

 




जीवनशैली बदलत चालल्याने सध्या केसांच्या गळतीची समस्या डोके वर काढत आहे. अनेकदा विविध उपचार घेऊन देखील ही समस्या काही कमी होत नाही. अशात तुम्हाला आहारात बदल करणे गरजेचे आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात... 


● तेलकट खाण्याने स्काल्प तेलकट होतात. यामुळे तेलकटपणा तसाच राहतो आणि छिद्र बारीक होतात. केसांची गळती वाढते.


● आईस्क्रीमच्या सेवनाने हार्मोन्स असंतुलित होतात. इन्स्युलिन आणि अँड्रोजन वर देखील प्रभाव पडतो या मुळे केसांच्या गळतीचा त्रास तसाच राहतो.


● केसांच्या गळतीसाठी मद्यपानाचे सेवन करत असाल तर बंद करा. या मुळे केसांची गळती होते. हे केसांच्या प्रथिन सिंथेसिस वर नकारात्मक प्रभाव टाकतात. यामुळे केस कमकुवत होतात.


● इन्सुलिन प्रतिरोध आपल्या केसांच्या गळतीसाठी कारणीभूत असतात. यामुळे केसांची गळती होते. म्हणून साखर खाणे थांबवा.