जेवणानंतर लगेचच झोपणे आरोग्यासाठी धोकादायक!

 




अनेकांना जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. मात्र हि सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात... 


● जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. 


● यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होते आणि ते छातीत जाते. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. 


● जेवल्या जेवल्या झोपल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.


● अशाने कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. 


● जेवण आणि झोपण्यामध्ये किमान एक ते दोन तासांचे अंतर असायला पाहिजे. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.


● अशाने पित्ताचा त्रास होण्याची शक्यताही आहे. कारण तातडीने झोपल्यास पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने पित्त वाढते.