कोरोना मुक्तीनंतर रुग्णांमध्ये नवीन धोक्याची घंटा!



● एकीकडे कोरोना संसर्गाचा धोका असताना दुसरीकडे त्यापासूनच्या दुष्परिणामांनी डोकं वर काढलं आहे. यामध्ये आता कोरोना रुग्णांमध्ये बहिरेपणाच्या समस्या वाढल्या आहेत.

● कोरोनातून बरं झालेल्यांना आता ऐकायला कमी  येण्याचं प्रमाण वाढलं आहे. दिल्लीतील सरकार रुग्णालयात असे १५ रुग्ण दाखल झाले आहेत, ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, मात्र त्यांना पहिल्यापेक्षा ऐकण्यास कमी येत आहे.



● त्यामुळे कोरोना बरा झाल्यानंतर तुमचा कान दुखत असेल, जड वाटत असेल किंवा एखादा आवाज येतोय असं वाटत असेल तर ७२ तासांच्या आत डॉक्टरांना दाखवा.

● सुरुवातीच्या काळात त्याच्यावर उपचार होऊन, श्रवण क्षमता शाबूत ठेवता येऊ शकते. मात्र जास्त वेळ केल्यास, त्यावर उपचार करणे कठीण होतं.