स्वमग्नता/ऑटिझम (Autism) म्हणजे काय?



स्वमग्नता/ऑटिझम (Autism) म्हणजे काय?

 स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार आहे. याचा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला.

अशी व्यक्ती आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात. ही मुले नेहमी समाजापासून, अवतीभवतीच्या वातावरणापासून अलिप्त राहतात.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं.अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही .


लक्षणे

• समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे.
• दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे.
• भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे.
• हाक मारली तर प्रतिसाद करत नाही
• समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे.
• स्वत:तच मग्न असणे.
• आवडणार्या गोष्टी वगैरे हाताच्या बोटाने point करत नाही.
• संवादासाठी बोट दाखवणे, खाणाखुणा वापरणे, मान हलवून होकार-नकार देणे यांचा अभाव असणे.
• दुसऱ्यांचे अनुकरण करता न येणे.
• डोळ्यांची, हातांची विचित्र हालचाल करणे.
• संपूर्ण वस्तूऐवजी तिच्या एखाद्या भागाकडेच बघत राहणे. (उदा. गाडीची फिरती चाके...).
• काल्पनिक खेळांत न रमणे.
• मैत्री करता न येणे.
• एकट्यानेच तोच- तोच खेळ खेळत राहणे.
• परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.
• एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे.
• एकाच गोष्टीत नको इतका रस दिसतो.
• अतिक्रियाशील वा अतिमंद असणे.
• प्रकाश, आवाज, स्पर्श, वास व चव यांबाबत कमालीचे संवेदनशील असणे.
• वस्तूंचा वास घेणे, चाटणे.
• वेदना झाल्यास तसा प्रतिसाद न देणे.
• परिचित व्यक्तीनेही जवळ घेतल्यास, मिठी मारल्यास विरोध दर्शवणे.
वरील पैकी काही लक्षणे असल्यास ऑटिझम आहे असे म्हणता येणार नाही. तसेच ही सर्व लक्षणे प्रत्येक मुलात आढळतातच असेही नाही. मात्र, यापैकी अनेक लक्षणे दिसू शकतात.


निदान:

बाल मेंदू विकार तज्ज्ञद्वारे आपल्या मुलाचे निदान करणे आवश्यक आहे. स्वमग्नताचे कोणतेही निश्चित कारण सापडले नाही. मेंदू पेशी (न्यूरॉन) कनेक्शनमध्ये समस्या असल्यामुळे स्वमग्नता उद्भवते. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांमधील परस्पर क्रिया त्यांच्यासाठी जबाबदार आहे .काही चाचण्या केल्या जातात कारण विशिष्ट आजार ऑटिझमच्या वाढत्या जोखमीशी संबंधित असतात. मुलाला ऐकू येते की नाही हे शोधण्यासाठी चाचणी केली जाते(BERA Test). एमआरआय, रक्त चाचणी, ईईजी, अनुवांशिक चाचणी यासारख्या इतर चाचण्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात


उपचार :

ऑटिझम औषधाने बरे करता येत नाही. परंतु मल्टि डिसिप्लिप्लिनरी उपचार(multidisciplinary treatment) व औषध यांचा समन्वय सह ऑटिझमचे व्यवस्थापन केले जाऊ शकते आणि या मुलांना मुख्य प्रवाहात आणले जाऊ शकते. प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे आयईपी(वैयक्तिकृत शिक्षण योजना,IEP) तयार करण्यात येतो. त्यानंतर प्रायमरी गोल ठरवून त्यावर काम करण्यात येते. विशेष शिक्षण(Special Education), स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, sensory integration therapy, ABA therapy, वर्तनविषयक बदल थेरपी(behavioural modification therapy) इ.नुसार मुलांवर उपचार केले जातात. मायकेलएंजेलो, सर आयझॅक न्यूटन, निकोला टेस्ला, चार्ल्स डार्विन, अल्बर्ट आइनस्टाईन, इत्यादी प्रसिद्ध लोकांना स्वमग्नता असूनही संबंधित क्षेत्रात स्वत: च्या शिखरावर पोहोचले होते. स्वमग्नताचा अर्थ असा नाही की जगाचा शेवट. आपण आपल्या मुलाची सामर्थ्य(strength) शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचे पोषण केले पाहिजे आणि त्याची उत्कृष्ट क्षमता साध्य करण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे


डॉ. Sunil Sable , MD

 
बाल व किशोरवयीन मुलांचा मेंदूरोग तज्ज्ञ.