कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास नुकसान होते?

 


 


● सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचा मोठा तुटवडा असल्याने अनेकांना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होत आहे.

● यामुळे अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्यास त्याचा काही अपाय होणार का?

● कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिला जातो. मात्र दुसरा डोस ला विलंब झाल्यास पहिला डोस निष्प्रभ ठरत नाही असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

● त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी अगदी चिंता करण्याचे कारण नाही मात्र लस उपलब्ध झाल्यास ती तात्काळ घ्यावी.