जास्त वेळ काम करताय? डब्ल्यूएचओने दिला गंभीर इशारा

जास्त वेळ काम करताय? डब्ल्यूएचओने दिला गंभीर इशारा


● धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात नोकरी मिळवणे आणि ती टिकवणे यासाठी कर्मचाऱ्यांकडून जास्तीचे काम केले जाते. मात्र यासंदर्भात डब्ल्यूएचओने गंभीर इशारा दिला आहे.

● जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे 2016 मध्ये केलेल्या जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला गेला. यातील निष्कर्षांवरून जास्त काम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका वाढत असल्याचं सांगितलं आहे.

● यामध्ये 7,45,000 लोकांचा अभ्यास करण्यात आला होता. यातील अनेकांचा जास्त वेळ काम केल्याने हृदयविकाराचा धक्का आणि झटका येऊन मृत्यू झाल्याचं जर्नल एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.

● हे मृत्यूचे प्रमाण 2000 सालापासून 30 टक्‍क्‍याने वाढले असून आठवड्याला 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करणे हे आरोग्यासाठी धोक्याचं असल्याचं डब्ल्यूएचओने सांगितल आहे.