तेजस्वी व आकर्षक दिसण्यासाठी 'हे' करा

beed News,Beed Newspaper,Beed Reporter,Breaking News Beed,lokprashna news paper beed,Corona News Beed, बीड जिल्हा लाईव्ह बातम्या


सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक समर्पक ठरेल. जाणून घेऊया सविस्तर माहिती..

एक ग्लास पाणी घेऊन गरम करा. आता या पाण्यामध्ये 3 चमचे साखर आणि 1/4 चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि कॉफी मग मध्ये गाळून घ्या. आता हे पाणी घोट घोटभर चहा सारखे प्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोस्ट वा कुकीज सोबत सुद्धा हे ड्रिंक पिऊ शकता.

ग्रीन टी आईस क्यूब सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सर्वात आधी ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रे मध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवून द्या. सकाळी एक आईस क्यूब घेऊन तो हलका हलका चेहऱ्यावर चोळा. तुम्ही सुती रुमाला मध्ये लपेटून नंतर त्वचेवर आईस क्यूब लावावे.