कोरोनाग्रस्त मातेचे स्तनपान सुरक्षित आहे ?

 


कोरोनाग्रस्त मातेचे स्तनपान सुरक्षित आहे ?


● कोरोना आणि त्या दरम्यानच्या अनेक प्रश्नांनी सध्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामध्ये कोरोनाग्रस्त मातेचे स्तनपान सुरक्षित आहे का ? हा देखील प्रश्न आहे.

● यावर जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्पष्ट केले आहे की कोरोना पॉझिटिव्ह मातांनी आपल्या नवजात बाळाचे स्तनपान चालू ठेवावे. कारण कोरोना संसर्गापेक्षा स्तनपानाचे फायदे जास्त आहे.

● कोरोनाचा धोका लहान मुलांना कमी आहे. मात्र त्यांना स्तनपान आभावी काही आजार होऊ शकतात. त्यामुळे आईने करुणा नियमांचे पालन करून स्तनपान करावं.

● आईची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल केले असेल आणि ती स्तनपान करू शकत असेल तर बाळाला तिचे दूध काढून द्यावे.

● यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टर आयुष्य बॅनर्जी यांनी देखील आतापर्यंत आईच्या दुधात थेट जिवंत व्हायरस सापडल्याचा सिद्ध झालेला नाही.

● तर आयसीएमआरच्या मते आईने साबणाने हात स्वच्छ धुऊन तोंडावर मास्क लावून स्तनपान करावे. त्यांनतर बाळाला पॉझिटिव्ह नसलेल्यांकडे द्यावे.