ताक आणि लस्सीचे सेवन ठरते शरीरासाठी फायदेशीर



● ताक आणि लस्सी दोन्ही प्रोबायोटिक्सने समृद्ध असतात जे पचन व्यवस्थित ठेवतात, तसेच आरोग्याची काळजी घेतात. 

● आयुर्वेदानुसार ताक हे सात्विक अन्न आहे. जे आंबटपणा नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. 

● जर तुम्ही जेवणात जास्त मसाले वापरत असाल तर अन्नाबरोबर ताक प्या, तुमचे पचन ठीक होईल. 

● ताक रक्तदाब नियंत्रित करते आणि कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंध करते. 

● ताक आपण दिवसातून अनेक ग्लास पिऊ शकता. ताकात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, जे तुमचे वजन कमी करण्यास खूप मदत करते.

● लस्सी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. लस्सी प्यायल्याने भूक शांत होते, तसेच पचनही ठीक होते.

● पोटाच्या समस्यांवर लस्सी हा उत्तम उपाय आहे. त्याच्या सेवनामुळे आतड्यात संसर्ग होत नाही.

● लस्सीच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते, तसेच हाडेही मजबूत राहतात.