शरीरातील साखर नियंत्रणासाठी 'या' भाज्या ठरू शकतात फायदेशीर



कार्बोहायड्रेटयुक्त खाण्याच्या वस्तूंचा ब्लड शुगरच्या स्तरावर मोठा प्रभाव पडतो.

यासाठी कोणत्या भाज्या खाणे डायबिटीज रूग्णांसाठी लाभदायक आहे ते जाणून घेवूया…

● ब्रोकली - ब्रोकलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के आढळते. ब्रोकोलीचा जीआय (ग्लायसेमिक इंडेक्स) केवळ 10 आहे.

● टोमॅटो - टोमॅटोमध्ये क्रोमियम आढळते, जे ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

● फ्रोजन मटर - यामध्ये पोटॅशियम, आयर्न आणि फायबरची चांगली मात्रा आढळते. फ्रोजन मटरचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

● गाजर - कच्च्या गाजरचा जीआय 14, जो खुप कमी आहे, परंतु जर त्यास उकडले तर तो वाढून 41 होऊ शकतो. यामध्ये खुप कमी स्टार्च असते. गाजर डायबिटीजसाठी लाभदायक आहे.

● बीट - बीटमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी आढळते. बीट सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.