जाणून घ्या, दोरी उड्या मारण्याचे शरीरासाठी फायदे


जाणून घ्या, दोरी उड्या मारण्याचे शरीरासाठी फायदे


अनेकजण शारीरिकदृष्ट्या तंदूरस्त राहण्यासाठी सकाळी दोरीउड्या मारत असतात. 


पण आजही असे बरेच लोकं आहेत ज्यांना दोरी उडी मारण्याच्या फायद्यांविषयी माहिती नाही. चला तर मग दोरी उड्या मारण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.


दोरी उड्या मारण्याचे फायदे

● दोरी उड्या मारल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमितपणे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटे दोरी उड्या मारल्या पाहिजे.

● नियमितपणे दहा मिनिटे दोरी उड्या मारल्याने रक्ताभिसरण सुधारते.

● तुम्ही जर नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

● दोरी उड्या मारल्याने फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि त्यांची क्षमता वाढवते.

● नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

● दोरी उड्या मारल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

● तुम्ही दररोज नियमित दोरी उड्या मारल्या तर तुमची हाडे मजबूत होतील आणि संतुलनात लक्ष केंद्रित करते.